कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस
माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी …